धरणगाव येथे ग्रंथालय उद्घाटनप्रसंगी मान्यवरांचा सुर
अमळनेर । येथील चौधरी सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय उद्घाटन विक्रम ग्रंथालय धरणगाव येथील अध्यक्ष व सामाजिक समरसता मंच प्रमुख प्रा. आर. एन. महाजन यांच्याहस्ते या वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून डी.जी. पाटील, डॉ. संजीवकुमार सोनवणे, शरद बन्सी, पोलिस निरीक्षक सोनवणे, नगरसेवक पप्पु भावे, चर्मकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भानुदास विसावे, पी.सी. पाटील, आर.डी. महाजन, प्रा. बी.एल. खोंडे व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कर्तव्य बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष व वाचनालयाचे व ग्रंथालय अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते यांनी आपले मनोगत व्यक्त करत असतांना सांगितले की, तरूणांमध्ये वाचनसंस्कृती वाढावी, आजच्या २१ व्या शतकात मानवाने नवनवीन तंत्र विकसीत करून प्रगती केली असली तरी मोबाईल, सोशल मिडीयामुळे वाचन संस्कृतिचा अभाव दिसून येत आहे.
वाचनातून मिळते प्रेरणा
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तसेच चांगले ग्रंथ वाचून मनावर उत्तम संस्कार होण्यास वाचनालय व ग्रंथालय एक मार्गदर्शक व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी प्रा.आर.एन. महाजन म्हणाले की, चांगली दर्जेदार पुस्तक वर्तमानपत्रातील चांगले लेख निसर्ग कवी बालकवी ठोंबरे यांच्या कविता, साहित्य तरूणांना प्रेरणा मिळू शकते असे विचार व्यक्त केले. यावेळी डॉ. सोनवणे, पोलिस निरीक्षक सोनवणे, डी.जी. पाटील यांनीही या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन बी. आर महाजन यांनी मांडले तर आभार सागर पाटील यांनी मानले.