जळगाव – मोबाईलवर चित्रपट बघत असतांना मागुन येवून अज्ञात चोरट्यांने हातातील मोबाईल हिसकावून दुचाकीने पळ काढल्याची घटना मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास घडली असून अज्ञात चोरट्याविरोधात रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, राहुल वैज्यनाथ शिल्पकार (वय-19) रा. लखनौ हा राष्ट्रीय महामार्गावरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर काही दिवसांपासून प्लॅस्टिकची फुले विकण्यासाठी मुक्कामाला आहे. 29 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास दिवसभर प्लॅस्टीकची फुले विकणारे सायंकाळी निवांत वेळी आपल्या 15 हजार रूपये किंमतीच्या मोबाईलवर चित्रपट बघत असतांना अज्ञात चोरट्यांनी हातातील मोबाईल हिसकावून महामार्गावरून पळ काढल्याचा प्रकार घडला. राहूल शिल्पकार यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.