मोबाईल हिसकावून दुचाकीने दोघे भामटे फरार

0

जळगाव । मोबाईलवर बोलत बोलत रस्त्याने पायी जाणार्‍या व्यक्तीच्या हातातून अज्ञात चोरट्यांनी हिसकावून दुचाकीने फरार झाल्याची घटना आज गुरूवारी रात्री 10.45 वाजेच्या सुमारास घडली असून जिल्हापेठ पोलीसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, अण्णा माधवराव देशमुख (वय-31) रा. कासमवाडी, जुना, मेहरूण रोड हे गुरूवार 2 ऑगस्ट रोजी रात्री 22.45 वाजेच्या सुमारास बीएसएनएल ऑफिस समोर स्वातंत्र्य चौकाकडे पायी जात असतांना मागून पांडे डेअरी चौकाकडून दुचाकीवर अज्ञात दोघेजण आल्यावर लीनोओ कंपनीचा 6 हजार रूपयाचा मोबाईल हिसकावून फरार झाल्याची घटना घडली. याबाबत जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.