मोबोट खुणवाला मोहम्मद फराह ठरला स्पोर्ट्स पर्सन ऑफ इअर

0

लंडन । एकेकाळ असा होता की कुठल्याही आंतरराष्ट्रीय पातळीवरील 10 हजार मीटर धावण्याच्या शर्यतीतील पहिल्या तीन क्रमांकावर इथोपियन धावपटूंचे वर्चस्व असायचे. 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकपासून सुरु झालेला इथोपियन धावपटूंचा करिष्मा 2012 च्या लंडन ऑलिम्पिकपर्यत कायम होता. लंडन ऑलिम्पिकमध्ये इंग्लंडच्या मोहम्मद फराहने पहिल्यांदा त्या वर्चस्वाला तडा दिला.

2012 आणि 2016 च्या ऑलिम्पिकमध्ये इंग्लंडला सुवर्णपदक जिंकून देणार्‍या मोहम्मद फराहला बीबीसीने स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार देऊन गौरवले आहे. जमैकाचा आघाडीचा धावपटू युसैन बोल्टप्रमाणे मोहम्मद फराहचीही विजयाची वेगळी खुण आहे. मोहम्मद फराह प्रत्येक शर्यत जिंकल्यानंतर डोक्यावर दोन्ही हातांची बोटे टेकवून मोबोटची खुण करतो. विशेष म्हणझे फराहने इंग्लंडला 10 हजार मीटर अंतराच्या शर्यतीत दोन सुवर्णपदके जिंकुन दिल्यावर त्याच्या सन्मानार्थ इंग्लंडची राणी क्विन एलिझाबेथनेही मोबोटची खूण केली होती. राणीच्या या कृतीची त्यावेळी खूप चर्चा झाली होती.