रावेर :– तालुक्यातील मोरगाव खुर्द येथील योगेश उर्फ जितेंद्र हरी पाटील (28) या तरुणाने रविवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. रावेर ग्रामीण रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी मयत घोषीत केले. याबाबत सिताराम गणू पाटील यांनी रावेर पोलिसात खबर दिली.