रावेर– तालुक्यातील मोरगाव शिवारात तडससदृश हिंस्त्र प्राण्याचा मुक्त संचार सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे. मोरगाव व तामसवाडी शेत-शिवारात नागरीकांच्या म्हणण्याप्रमाणे वाघाचे दर्शन झाले तर रावेर वन विभागाला माहिती कळवल्यानंतर वनकर्मचार्यांनी घटनास्थळी भेट देत पगमार्ग घेतल्यानंतर तो प्राणी तडस असल्याचे सूत्रांनी सांगितले. पाण्याच्या शोधार्थ अथवा शिकार करण्याच्या हेतूने या भागाकडे तडस आला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे