पिंपरी : वाळलेल्या गवताला अचानक आग लागल्याची घटना सोमवारी (दि. 28) रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास मोरवाडी येथे घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने आग विझवली. सुदैवाने या आगीत कोणतीही हानी झाली नाही. या घटनेप्रकरणी, उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आलेली नव्हती.
नागरिकांनी कळवली माहिती
मोरवाडी येथील एका मोकळ्या पटांगणात असलेल्या वाळलेल्या गवताला अचानक आग लागली. वार्यामुळे ही आग भडकत होती. हा प्रकार समजताच स्थानिक नागरिकांनी घटनेविषयी अग्निशामक दलाला माहिती दिली. अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पिंपरीच्या एका बंबाने ही आग आटोक्यात आली. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.