पिंपरी : मोरवाडी येथील आयटीआयमधील प्रवेश शुल्कात मोठी वाढ केली आहे. यामध्ये कपात करुन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी केली आहे. याबाबत महापौर नितीन काळजे व महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, यापूर्वी संस्थेतील विविध कोर्सेसचे शुल्क 1200 रुपये होते. गतवर्षीपासून ते 20 हजार केले आहे.