पिंपरी-चिंचवड : जिल्हा शिक्षण मंडळाच्या प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयात रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण, रोटरी क्लब ऑफ इन्स्पिरिया यांच्या सहकार्याने ‘जागर महिला आरोग्याचा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत, डॉ. मानसी पाटील यांचे ‘महिलांचे आरोग्य’ या विषयावरील व्याख्यान आणि महाविद्यालयात रोटरी क्लब ऑफ इन्स्पिरिया यांच्या वतीने बसविण्यात आलेल्या ‘सॅनिटरी नॅपकीन इन्सिनरेटर’चे उद्घाटन करण्यात आले.
वुमन हायजिन प्रकल्पाविषयी माहिती
रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणच्या डॉ. मानसी पाटील यांनी व्याख्यानात, तरूण वयातील मुलींमधील शारीरिक व मानसिक बदल, वाढते ताण आणि त्याचा होणारा परिणाम, याविषयीची माहिती दिली. मासिक पाळी संबंधीच्या तक्रारी, अशक्तपणा, अॅनमिया, हिमोग्लोबिन याविषयीदेखील त्यांनी माहिती दिली. उत्तम व सकस आहार, शांत झोप, नियमित व्यायाम, या मूलभूत गोष्टी जरी सांभाळल्या तरी त्यामुळे आरोग्य टिकून राहू शकते, असे त्यांनी सांगितले. सुनीता कटारिया यांनी वुमन हायजिन या प्रकल्पाची माहिती सांगितली.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ इन्स्पिरियाच्या सेक्रेटरी संगिता माळी, जयश्री बालघट, रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणचे रिकिल जोज, फर्स्ट लेडी वसुधा गावडे, प्रेसिडेंट विलास गावडे, प्रोजेक्ट इनचार्ज सुनील कुलकर्णी, मराठी विभागप्रमुख प्रा. अपर्णा पांडे, डॉ. इंगोले, प्रा. अर्चना टंक, प्राचार्य डॉ. एम. जी. चासकर उपस्थित होते.
महिला सक्षमीकरण समितीच्या प्रमुख अर्चना टंक यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. मराठी विभागप्रमुख अपर्णा पांडे यांनी सूत्रसंचालन केले. तर महाविद्यालयातील महिला अत्याचार व छळविरोधी समितीच्या प्रमुख डॉ. पद्मा इंगोले यांनी आभार मानले.