पिंपरी-चिंचवड : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयात दिवंगत शारदाबाई पवार यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. प्राचार्य डॉ. एम. जी. चासकर यांनी शारदाबाई पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. तुषार शितोळे, डॉ. अभय खंडागळे, डॉ. धनंजय वाघमारे, डॉ. मोहन चौधरी, प्रा. एस. एस. काटे, प्रा. अंकुश जाधव , प्रा. आर. बी. नांगरे, सचिन इंदुरे, अशोक परंडवाल, राजू ननावरे उपस्थित होते.
शारदाबाई पवार यांचे कार्य मोठे
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्राचार्य एम. जी. चासकर म्हणाले की, शारदाबाई पवार यांचे कार्य मोठे असून, संस्थेच्या स्थापना काळात त्यांनी आजीव सदस्य म्हणून काम केलेले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी घेतले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमप्रसंगी विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.