मुंबई – मुंबई महानगर पालिकेने सीएसएमटी ते आझाद मैदान दरम्यान मराठा क्रांती मोर्चानंतर झालेला अडीच टन घन कचरा हटविण्यासाठी ८० स्वयंसेवी संस्थांमधील मजूरांची मदत घेतली. या शिवाय पालिकेचे ४० कर्मचारीही या कामात मदत करीत आहेत.
महापालिकेच्या ए वॉर्डच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की मोर्चेकऱ्यांनी केलेला कचरा प्रामुख्याने पाण्याच्या बाटल्या, प्लास्टीक पिशव्या आणि कागदांचा समावेश होता. जेजे प्लायओव्हर आणि डी.एन.रोडवर काल रात्रभर मजूर कचरा उचलीत होते.
या ठिकाणी आम्ही पिण्याच्या पाण्याचे टँकरही तयार ठेवले होते. या शिवाय स्वच्छतागृहांची सोयही केली होती, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले. पे अँड युज स्वच्छतागृहे मोफत वापरू देण्याचे आदेशही कंत्राटदारांनी दिले होते अशी माहितीही पालिकेने दिली.