जयपूर । मगायफ राष्ट्रीय प्राणी घोषित करता करता देशात आणखी एक थोडा गंमतीशीर वाद उभा राहिलाय. राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश महेंद्र चंद्र शर्मा यांच्या एका वक्तव्यामुळे हा वाद उभा राहिलाय. मीडियाशी बोलताना न्यायाधीश शर्मा यांनी भारताने ममोरफ हा राष्ट्रीय पक्षी म्हणून का घोषित करण्यात आला, त्याचे कारण सांगितले. मोर हा सेक्स करत नाही, तो ब्रह्मचारी असतो, म्हणून तो आपला राष्ट्रीय पक्षी आहे, असे शर्मा यांनी म्हटले आहे. याच दिवशी न्यायाधीश शर्मा सेवानिवृत्त झालेत.
मआपण मोर हा राष्ट्रीय पक्षी म्हणून का घोषित केला? यासाठी कारण मोर आजीवन ब्रह्मचारी राहतो. मोर रडताना त्याचे अश्रु येतात ते पिऊन लांडोर गर्भवती होते. मोर कधीही लांडोरीसोबत सेक्स करत नाहीफ असं शर्मा यांनी म्हटले आहे. भगवान कृष्णांनीदेखील आपल्या मुकूटात मोरपंख यासाठीच लावले कारण मोर ब्रह्मचारी असतो. साधुसंतदेखील यासाठी मोराचे पंख वापरतात, मंदिरांत मोरपंख लावले जातात. याचप्रमाणे गायीतही असे गुण असतात त्यामुळे तिला मराष्ट्रीय प्राणीफ घोषित केले गेले पाहिजे, असेही शर्मा यांचे म्हणणे आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात यावे आणि गोहत्या करणार्यांना आजीवन तुरुंगाची शिक्षा ठोठावण्यात यायला हवी, असे वक्तव्य त्यांनी एक निर्णय सुनावणी दरम्यान केले. त्यांच्या याच वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.