मोशी : किराणा दुकानामध्ये सकाळी बिस्किटे आण्यासाठी गेलेल्या तेरा वर्षाच्या मुलीवर दुकानदाराने बलात्कार केल्याची घटना बुधवारी मोशी येथे सकाळी घडली. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली. वैभव मल्लिकार्जुन एकलारे (वय 19, रा. खान्देशनगर, मोशी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमराव शिंगाडे यांनी सांगितले की, बुधवारी सकाळी सातच्या सुमारास तेरा वर्षाची मुलगी गल्लीतल्या किराणा दुकानात बिस्किट आणण्यासाठी गेली. बिस्किटे घेऊन जात असताना किराणा दुकानातील मुलाने तिला कुत्रा चावेल असे म्हणून दुकानात नेले व दुकानाचे शटर लावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याबाबत मुलीचे आईला सांगितल्यावर मुलीच्या आईने पोलिसात धाव घेतली. 19 वर्षीय मुलाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी एमआयडीसी पोलिस पुढील तपास करीत आहेत.