मोशी उपबाजारात बटाटा, रताळ्याची आवक वाढली

0

नवरात्रौत्सवाचा परिणाम, पालेभाज्यांचीही विक्रमी आवक

पिंपरी-चिंचवड : नवरात्रौत्सवादरम्यान मोशीतील नागेश्वर महाराज उपबाजारात बटाटा व रताळ्याची मोठी आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत बटाट्याची आवक 148 क्विंटलने वाढली. तर रताळ्याची 18 क्विंटल आवक झाली आहे. फळभाज्यांची आवक 36 क्विंटलने वाढली असून, पालेभाज्यांची आवक 7 हजार 930 गड्ड्यांनी वाढली आहे. या आठवड्यात बटाटा व पालेभाज्यांची विक्रमी आवक झाली आहे.

कांद्याच्या भावात घट
या आठवड्यात कांद्याची आवक 20 क्विंटलने वाढून सरासरी भावात 250 रुपये घट झाली. बटाट्याची 233 क्विंटल विक्रमी आवक होऊन भावात 100 रुपयांची वाढ झाली. आल्याची आवक 9 क्विंटलने घटली असून, भाव मात्र स्थिर राहिले. भेंडीची आवक एक क्विंटलने घटली असून, भाव 1000 रुपयांची वाढ झाली. गवारीची आवक एक क्विंटलने वाढून भाव मात्र स्थिर राहिले. टोमॅटोची आवक 16 क्विंटलने घटली असून, भाव 150 रुपयांनी वाढले. मटारची आवक एक क्विंटलने घटूनही दरात 1000 रुपयांची वाढ आली. घेवड्याची आवक चार क्विंटलने घटली असून, भाव स्थिर राहिले. दोडक्याची आवक सात क्विंटलने घटूनही भाव स्थिर राहिले.

भुईमूग शेंगांची आवक 18 क्विंटलने वाढली
मिरचीची आवक आठ क्विंटलने घटली असून, भावात 250 रुपयांची घट झाली आहे. दुधी भोपळ्याची आवक व भाव स्थिर राहिले. भुईमूग शेंगांची आवक 18 क्विंटलने वाढली असून, भावात 250 रुपयांची वाढ झाली. काकडीची आवक पाच क्विंटलने घटुनही भाव मात्र, स्थिर राहिले. कारल्याची आवक बारा क्विंटलने वाढली असून, भाव 500 रुपयांनी घटले. फ्लॉवरची आवक 37 क्विंटलने घटून भावात 300 रुपयांची वाढ झाली. कोबीची आवक 18 क्विंटलने घटूनही भावात 200 रुपयांची घट झाली. वांग्यांची आवक एक क्विंटलने घटली असून, भाव मात्र 500 रुपयांनी वधारले