मोशी रस्त्यावर अज्ञाताची आत्महत्या

0

पिंपरी-चिंचवड : पुणे-नाशिक महामार्गालगत मोशी येथे एका अज्ञात व्यक्तीने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.

त्याच्या जवळ त्याची ओळख पटवून देणारा एकही पुरावा नव्हता तसेच परिसरातही तो कोणाच्या ओळखीचा नसल्याने त्याची ओळख पोलिसांना अद्याप पटलेली नाही. सावळा, उंची 5 फुट, मध्यम बांधा असे त्याचे वर्णन आहे. ओळख न पटल्याने त्याच्या आत्महत्येचे कारणही कळू शकलेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.