पिंपरी चिंचवड : पिंपरी विधानसभेचे शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार यांनी मोहननगर, चिंचवड येथे ‘आमदार आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. विविध शासकीय योजनांची प्रकरणे एकाच ठिकाणी एकाच दिवशी मार्गी लागण्यासाठी महादेव मंदीर येथील शिवपार्वती सभा मंडप येथे गुरूवारी दि.25 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे.
हे देखील वाचा
विविध योजनांचा मिळणार लाभ…
यामध्ये, संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत नागरिकांना मिळणारे सर्व लाभ याठिकाणी तात्काळ फॉर्म भरून त्वरीत मार्गी लागणार आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील अंध, अपंग, मूकबधीर, कर्ण बधीर, मतिमंद, क्षयरोग, पक्षघात, विधवा महिला, कर्करोग, कुष्ठरोग, एड्स (एच.आय.व्ही.) घटस्फोटीत महिला, अत्याचारित महिला परितक्ता महिला, अनाथ मुले-मुली, यांना संजय गांधी निराधार योजनेमार्फत पेन्शन योजना व 65 वर्षावरील नागरिक ज्यांना मुलगा नाही अशा नागरिकांना श्रावण बाळ योजनेमार्फत व इतर शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांना रहिवासी दाखला, तलाठी उत्पन्न दाखला, तहसीलदार उत्पन्न दाखला, संमतीपत्र आदी सुविधा जागेवर उपलब्ध करून दिल्या जातील. या सर्व योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आमदार ड. गौतम चाबुकस्वार व संजय गांधी निराधार अनुदान समितीचे अध्यक्ष नितीन घोलप यांनी केले आहे.