चिंचवड । राणी उर्फ मोहिनी चंद्रकांत टेकवडे, अविनाश टेकवडे मित्र परिवार, युवा स्पोर्ट्स क्लब आणि एच. व्ही. देसाई हॉस्पिट,ल महंमदवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर रविवारी सकाळी 10 ते दुपारी एक वाजेपर्यंत चिंचवड, मोहननगर येथील ई. एस. आय. हॉस्पिटलजवळ होणार आहे. या शिबिरासाठी मुख्य वैद्य म्हणून डॉ. महेश पवार उपस्थित राहणार आहेत. शिबिरामध्ये मोफत नेत्रतपासणी करण्यात येणार आहे. चष्मा लागत असेल तर अत्यंत वाजवी दरात चष्मा वितरित केला जाणार आहे. तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया एच. व्ही. देसाई हॉस्पिटल येथे अल्पदरात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर क्लासिकल अॅक्युपंचर पद्धतीने उपचार करण्यात येणार आहेत.