16 सुवर्ण, 5 रौप्य, 6 कांस्य पदके
चिंचवड : वाकड येथे रविवारी (दि. 22 रोजी) झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत मोहननगर कराटे अकॅडमीला दणदणीत यश मिळाले आहे. या स्पर्धेमध्ये 16 सुवर्ण, 5 रौप्य, 6 कांस्य पदके मिळाली आहेत. स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र नोबुकावा-हा शितो-रियो कराटे डो यांच्यातर्फे इंडियाचे अध्यक्ष रेंशी नरेश शर्मा आणि सेन्साई देवेंद्र शर्मा यांच्या नेतृत्वाखाली खाली पार पाडली. महाराष्ट्राचे अध्यक्ष नंदकुमार दळवी, कमलेश पांडे, अशोक वेताळ आदी उपस्थित होते. सुनील कदम, अविनाश काळे, स्वप्नील गायकवाड, विशाल दौंडकर, मुकुंद मराठे, किसन धनवडे, संजय मोजर, सागर पुंडे, शिवतेज सावंत, तेजप्रताप पासवान, विश्वजित सावंत, समीर देवकर, रोहित पवार, रोहन पवार, छाया महामुनकर, सुशांत कांबळे, विवेक यादव, संदीप शिवशरण यांनी पंचगिरी केली.
विजयी खेळाडूंचे नगरसेवक प्रमोद कुटे, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, व्यवसायिक संजय पुंडे, सामा. कार्यकर्ते रखमाजी हुच्चे, उद्योजक पराग जाधव यांनी अभिनंदन केले. या मोहननगर कराटे अॅकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक नंदकुमार दळवी आणि प्रशिक्षक अविनाश काळे, सागर पुंडे यांनी प्रशिक्षक म्हणून कामगिरी पार पाडली. स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे आहेत – 6 वर्षांखालील मुली-आराध्या ओव्हाळ (काता, कुमिते-कांस्य), 7 वर्षांखालील मुली-अनन्या देसाई (काता-रौप्य, कुमिते-सुवर्ण), 7 वर्षांखालील मुले-शौर्य जोशी (काता-रौप्य, कुमिते-सुवर्ण), 8 वर्षांखालील मुली-संस्कृती घायाळ (काता-कांस्य), 10 वर्षाखालील मुले-भरत कुसवा (कुमिते-रौप्य) व इशिता कुदळे (काता-सुवर्ण), 10 वर्षांखालील मुले-तेजस शिंदे (काता-कांस्य), 11 वर्षांखालील मुले-अर्णव जाधव (काता व कुमिते-सुवर्ण), 12 वर्षांखालील मुले-ओमकार हरपाळे (काता-सुवर्ण, कुमिते-रौप्य) व तन्मय पाटील (काता-कांस्य, कुमिते-रौप्य), 15 वर्षांखालील मुले-नशीब ढेकळे (काता व कुमिते-सुवर्ण), 17 वर्षांखालील मुली-विशाखा घायाळ (काता-सुवर्ण, कुमिते-सुवर्ण), 18 वर्षांखालील मुले-प्रतीक नामदे (काता व कुमिते-सुवर्ण), 21 वर्षांखालील मुले-संदीप शिवशरण (काता- रौप्य, कुमिते- कांस्य), 21 वर्षांखालील मुले सिनिअर गट-सागर पुंडे (काता व कुमिते-सुवर्ण), 21 वर्षांखालील मुली सिनिअर गट-छाया महामुनकर (काता व कुमिते-सुवर्ण).