भुसावळ- रीपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले) या पक्षात सन 1981 पासुन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या सोबत काम केलेले राज्य कमेटीचे नेते व माजी नगरसेवक मोहन निकम यांनी नुकताच भारतीय रीपब्लीकन पक्ष, बहुजन महासंघात प्रवेश केला. रीपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयाचे नेते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाजपा व शिवसेना या जातीयवादी शक्ती सोबत युती केल्याने मोहन निकम यांनी या पक्षातील विविध पदाचा राजीनामा देवून अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने व प्रदेश निरीक्षक शरद वसंतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारीप-बहुजन महासंघात प्रवेश केला.