कोलकाता : एएफसी चषक फुटबॉल स्पर्धेत बुधवारी येथे झालेल्या सामन्यात मोहन बागान संघाने बेंगळूर एफसी संघाचा 3-1 असा पराभव केला. या विजयामुळे मोहन बागान संघाचे या स्पर्धेतील बाद फेरी गाठण्याचे आव्हान जिवंत राहिले आहे. इ गटातील या सामन्यात मोहन बागानतर्फे नवव्या मिनिटाला जेजे लालपेखुलाने, 74 व्या मिनिटाला किन लेविसने तर 80 व्या मिनिटाला विक्रमजीत सिंगने गोल नोंदविले. बेंगळूर एफसीचा या गटातील शेवटचा सामना 31 मे रोजी माझिया संघाबरोबर होणार आहे.