हरसोली: सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताफ्यातील कारने दिलेल्या धडकेत सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. आज बुधवारी हा अपघात झाला. मोहन भागवत राजस्थानहून परतत असताना हा अपघात झाला. जयपूरमधील हरसोली मुंदवार रस्त्यावर हा अपघात झाला. कारने एका दुचाकीला धडक दिली. यावेळी हा मुलगा दुचाकीवर प्रवास करत होता. मोहन भागवत यांच्या ताफ्यातील कारने ज्या दुचाकीला धडक दिली ती स्थानिक सरपंच चेतराम यादव यांच्या मालकीची आहे. अपघातात चेतराम यादव गंभीर जखमी झाले आहे. मात्र अपघतात त्यांचा नातू सचिन याचा मृत्यू झाला.
मोहन भागवत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन दिवसीय समन्वयक बैठकीसाठी राजस्थानमध्ये गेले होते. विशेष म्हणजे आज मोहन भागवत यांचे वाढदिवस आहे आणि आजच त्यांच्या ताफ्यातील कारने एका मुलाचा मृत्यू झाला आहे.