जामनेर- (प्रतिनिधी ) गेंदाबाई मोहनलाल लोढा मोहन भुवन प्रतिष्ठानचे कार्य गौरवास्पद असून प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद भाई लोढा यांची गोरगरिबां विषयी असलेली आत्मीयता, तळमळ ही खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. या स्वार्थी जगातही प्रतिष्ठानचे कार्य हे निस्वार्थी भावनेतून सुरू असून सतत बारा महिने जीवनावश्यक वस्तू देऊन गरिबांना मोठा आधार व दिलासा देणारे मोहन भुवन प्रतिष्ठान हे राज्यांमधील एकमेव प्रतिष्ठान असेल असे गौरवोद्गार मुंबई निवासी सामाजिक कार्यकर्ते शेखर शैले यांनी व्यक्त केले.
मोहन भुवन प्रतिष्ठानतर्फे ‘कमल मोहन राशन किट योजना’ अंतर्गत या महिन्यात २६० लाभार्थ्यांना पाच किलो आटा, तेल पाऊस व इतर जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून शेखर शैले बोलत होते. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून नताशा शैले, जितूभाई काळे उपस्थित होते.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद लोढा तसेच संचालिका वंदना लोढा यांनी आलेल्या मान्यवरांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जितूभाई काळे म्हणाले की, लॉक डाऊनच्या काळात तालुक्यातील व जिल्ह्यातील १७००० गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे राशन किट देऊन मोहन भुवन प्रतिष्ठान ने समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. लॉक डाऊन संपल्यानंतर ही त्यांचे कार्य थांबले नाही. असे हि ते म्हणाले . या कार्यक्रमास प्रतिष्ठानचे संचालक गोपाल देशपांडे, रतनसिंह राणा, दीपक देशमुख, अॅड. विकास चौधरी मयूर सोनार उपस्थित होते.