मोहमांडलीत पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली

0

रावेर। तालुक्यातील मोहमांडली येथे जिल्हा परिषद सदस्या सुरेखा पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मोठी पाण्याची समस्या सुटली त्यामुळे गरीब आदिवासी बांधवांची पाण्यासाठी भटकंती थांबलेली आहे. मोहमांडलीतील एका तांड्याजवळील हातपंप अनेक महिन्यांपासून नादुरुस्त होते त्यामुळे येथील नागरिकांची पाण्यासाठी मोठी भटकंती होत होती.

येथील पाण्याची समस्याची वार्ता चिनावल येथील जिल्हा परिषद सदस्या सुरेखा पाटील यांना कळल्या नंतर त्यांनी पाठपुरावा केला व रावेर पंचायत समिती पाणी पुरवठा विभागचे कापडे यांना या नादुरुस्त हातपंपची बाब लक्षात आणून देऊन तो दुरुस्त करून येथील तांड्याला पाणी उपलब्ध करून दिले आहे. यावेळी नरेंद्र पाटील (चिनावल) जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे, स्वप्नील पाटील, सुनील फिरके, मधुकर गाजरे, सुभाष बोरवले आदी उपस्थित होते.