रावेर : तालुक्यातील मोहमांडली माध्यमिक आश्रमशाळेत इयत्ता पाचवीचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सुनील ग्यानसिंग पावरा (12) असे मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे. मोहमांडली माध्यमिक आश्रमशाळेत पाचवीत शिक्षण घेणार्या सुनील पावरा याच्यावर टीबी आजाराचे उपचार सुरू होते व याच आजाराने त्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज आहे.