मोहम्मदी युवा ग्रुप मित्र मंडळतर्फे ईद मिलन सोहळा उत्साहात

0

निंभोरा । हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये सदभाव वाढावा आणि जातीय सलोखा जपला जावा तसेच जेष्ठ नागरिक युवा वर्गात विश्वासाचे नाते व मनोमिलन निर्माण व्हावे या उद्देशाने येथील मोंहम्मदी युवा ग्रुप मित्र मंडळावतीने नुकताच ईद मिलन सोहळा कार्यक्रम उत्साहात झाला. यावेळी हिंन्दू मुस्लिम बांधवांनी शिरखुर्माचा आस्वाद घेतला.

यशस्वीतेसाठी यांनी घेतले परिश्रम
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोहम्मदी युवा ग्रुप मित्र मंडळ अध्यक्ष दस्तगीर पटेल, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा सचिव आरीफ खान, इमरान पटेल, राजू पटेल, अमजद खान, शाकिर खाटिक, नुर मोहम्मद पटेल, अजहर शेख, इसाक पटेल, मोइनखान, सलमान खान, बाबाखान, दिपक सोनवणे, अमोल गिरडे, आफताब खाटिक, जावेद खाटिक, इरफान खान, असद शेख, हर्षल, गोलु राठोड यांनी परिश्रम केले. सूत्रसंचालन राजीव बोरसे यांनी तर आभार राजू पटेल यांनी मानले.

यांची होती उपस्थिती
कै. नामदेव खंडु ढाके पतसंस्था सभागृह स्टेशन रोड येथे आयोजित या ईद मनोमिलन कार्यक्रमास जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, दुर्गादास पाटील, चत्रभुज खाचणे, प्रल्हाद बोंडे, पंचायत समिती सदस्य दिपक पाटील, सुनिल कोडे, चंद्रकांत खाचणे, डॉ. महेंद्र भालेराव, ग्रामपंचायत सदस्य मधुकर बिर्‍हाडे, रमेश येवले, राजीव बोरसे, दिलीप सोनवणे, दस्तगीर खाटीक, राजेश गुरव, आशिष बोरसे, काशिनाथ शेलोडे, किरण सपकाळे, तांदलवाडीचे सरपंच श्रीकांत महाजन आदी उपस्थित होते.