मोहम्मद अनास याहीयाचा नवा राष्ट्रीय विक्रम

0

नवी दिल्ली-भारताचा धावपटू मोहम्मद अनास याहीयाने झेक रिपब्लीक येथील ४०० मी. शर्यतीमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. ४५.२४ सेकंदात ही शर्यत पूर्ण करत मोहम्मदने नवीन राष्ट्रीय विक्रमही प्रस्थापित केला आहे. काही महिन्यांपूर्वी गोल्ड कोस्टमध्ये पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये मोहम्मदने ४५.३१ अशी सर्वोत्तम वेळ नोंदवली होती. मात्र राष्ट्रकुल स्पर्धेत मोहम्मदला पदकाने हुलकावणी दिली होती.

एम. आर. पुवम्मानं देखील महिलांच्या ४०० मीटरची शर्यत ५३.०१ सेकंदात पार करत भारतासाठी सन्मान मिळवला. धावपटू राजीव अरोकिया यानेही २०० मीटरचे अंतर २०.७७ सेकंदात पार केले.