मोहम्मद कैफ पुन्हा ट्रोल!

0

मुंबई । भारतीय संघातील माजी खेळाडू मोहम्मद कैफ सोशल मिडीयावर वारंवार कट्टरपंथियांच्या टीकेचा धनी बनत आहेत. सूर्यनमस्कारमुळे सोशल मिडीयावर ट्रोल झालेला कैफवर पुन्हा एकदा बुद्धिबळ खेळण्यावरून टीका होत आहेत. बुद्धिबळ खेळणे इस्लामविरोधात असल्याचे सांगत टीका झाल्या मात्र त्याचवेळी अनेकजण त्याच्या समर्थनात देखील उतरल्याचे दिसून आले.

मुलासोबतच्या फोटोवर टीका
कैफने 27 जुलै, 2017 रोजी सोशल मीडियावर आपल्या मुलासोबत बुद्धिबळ खेळतानाचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोला ‘शतरंज के खिलाडी’ असे कॅप्शन दिले होते. या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या. काही जण बुद्धिबळ खेळणं इस्लामविरोधात असल्याचे सांगत बुद्धिबळ खेळणे हराम असल्याचे सांगितले. कैफला इस्लामचा बोध देणार्‍यांना ‘चेस हराम आहे, क्रिकेट हराम आहे, झोपणे हराम आहे, पिणे हराम आहे, जगणे हराम आहे, चांगला धर्म आहे.’ अशा शब्दात कैफच्या समर्थकांनी टीकाकारांना झोडपून काढले आहे. याआधीही इरफान पठाण, शमीलादेखील ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. कैफने या प्रकाराबद्दल अद्यापही आपली प्रतिक्रिया दिलेली नाही.