कोलकाता । भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या अडचणीत भर पडलीये. त्याची पत्नी हसीन जहाने त्याच्याविरोधात कोलकातामध्ये एफआयआर दाखल केला आहे. हसीनने शमीविरोधात कोलकाताच्या लाल बाजार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. तिने शमीविरोधात मारहाण तसेच दगा दिल्याचा आरोप केला होता. मात्र हे आरोप शमीने फेटाळून लावले होते. कोलकाता पोलिसांनी हसीनच्या तक्रारीनुसार मोहम्मद शमीविरोधात भारतीय दंड विधानानुसार 498-/323/307/376/ 505/ 328/ या कलमांतर्गत गुन्हे दाखल केलेत.
शमीव्यतिरिक्त पोलिसांनी त्यांच्या कुटुंबातील आणखी चार सदस्यांविरोधातही एफआयआर दाखल केलाय. हसीन जहाँने शमीवर गंभीर आरोप लावले आहे. ती म्हणाली की शमीने दुबईमध्ये पाकिस्तानची अलिस्बा नावाच्या तरूणीकडून पैसे घेतले होते. यात मोहम्मद भाई नावाचा एक माणूसही सामील होता. ते इंग्लंडमध्ये राहतात. ती म्हणाली या संदर्भात माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. हसीन जहाँने शमी विरोधात भूमिका घेत म्हटले की शमी हा पत्नी म्हणून मला धोका देऊ शकतो, तर तो देशालाही धोका देऊ शकतो. शमीविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे काही गुन्हे हे अजामिनपात्र असल्यामुळे या प्रकरणात शमीला मोठी शिक्षा होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने, शमीचे इतर मुलींसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. आपल्या आरोपांची पुष्टी करण्यासाठी हसीनने शमीचे इतर मुलींसोबतच्या संभाषणाचे स्क्रिनशॉट आपल्या फेसबूक अकाऊंटवर शेअर केले होते.