नातेवाईकांनी मात्र व्यक्त केला खुनाचा संशय
यावल– तालुक्यातील मोहराळे येथील पिंटू भगवान अडकमोल (37, मोहराळा) या इसमाचा यावल-विरावली रस्त्यावर अपघाती मृत्यू झाल्याची माहिती असून नातेवाईकांनी मात्र अडकमोल यांचा खून झाल्याचा आरोप केला आहे. रविवारी रात्री अडकमोल हे दुचाकी (एम.एच.19 ए.एच.5367) ने यावलहून मोहराळा जात असताना विरावली गावाजवळ त्यांचा रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळला. तत्पूर्वी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आल्यानंतर डॉ.रश्मी पाटील यांनी मयत घोषित केले.
मुलाचा खून झाल्याचा आरोप
पिंटू अडकमोल याचा अपघातात मृत्यू झाला नसून खून करण्यात आल्याचा आरोप मयताचे वडील भगवान बालू अडकमोल यांनी केला आहे. यावल पोलिसात घनश्याम बाळू अडकमोल (37) यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव सामान्य रुग्णालयात हलवण्यात आला असून अहवालानंतरच काही सांगता येईल, असे पोलीस निरीक्षक दत्तात्रय परदेशी व सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश तांदळे यांनी ‘दैनिक जनशक्ती‘शी बोलताना सांगितले.
नातेवाईकांनी मात्र व्यक्त केला खुनाचा संशय
यावल- तालुक्यातील मोहराळे येथील पिंटू भगवान अडकमोल (37, मोहराळा) या इसमाचा यावल-विरावली रस्त्यावर अपघाती मृत्यू झाल्याची माहिती असून नातेवाईकांनी मात्र अडकमोल यांचा खून झाल्याचा आरोप केला आहे. रविवारी रात्री अडकमोल हे दुचाकी (एम.एच.19 ए.एच.5367) ने यावलहून मोहराळा जात असताना विरावली गावाजवळ त्यांचा रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळला. तत्पूर्वी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आल्यानंतर डॉ.रश्मी पाटील यांनी मयत घोषित केले.