मोहराळ्याच्या बालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

0

शेती फवारणीचे औषध केले प्राशन

यावल- तालुक्यातील मोहराळा येथील गणेश राजेश बारेला (2.5 वष) याने आपल्या घरात असलेली शेती फवारणीची औषधी पिवून आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्यास अत्यावस्थेत रुग्णलयात दाखल करण्यात आले. डॉ.मनोज पाटील, प्रियंका मगरे, कादर तडवी यांनी त्याच्यावर उपचार केले. आता त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

अट्रावलच्या इसमाचा आत्महत्येचा प्रयत्न
यावल तालुक्यातील अट्रावल येथील विनोद वसंत कोळी (35) या इसमाने रविवारी सकाळी राहत्या घरी गळ्यावर दोन्ही बाजुने ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब त्याच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यास तत्काळ ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. डॉ.स्वाती कवडीवाले, अरुण कोळंबे यांनी प्रथमोपचार करून जळगावी हलवले.

दुचाकी धडकल्या, तिघे जखमी
यावल- भुसावळ रस्त्यावर दोन दुचाकी समोरा-समोर धडकल्या. त्यात शेख आसिफ शेख नासीर (19, रा.मलकापूर), शेख अक्रम शेख सुभान (23, रा.यावल) व अमोल दौलत तायडे (16, रा.यावल) हे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना देखील जळगाव हलवण्यात आले.