यावल- तालुक्यातील मोहराळा येथील 25 वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी दुपारी त्यांचे कुटुंबीय जवळच असलेल्या हरीपुरा गावी गेले होते व ती घरात एकटी असताना घराशेजारील संशयीत आरोपी बशीर नजीर नहाळ हा सदर विवाहितेच्या घरात अनधिकृतपणे शिरला व माझ्या मोबाईल मध्ये बॅलन्स आहे किंवा नाही, असे तपासून देण्याच्या नावाखाली विवाहितेचा विनयभंग केला. तपास पोलीस उपनिरीक्षक एम.जे.मोरे करीत आहे.