मुंबई – दारू बनविण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या मोहाच्या फुलांवरील निर्बंध हटविण्याचा निर्णय गुरूवारी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एका निवेदनाद्वारे विधान परिषदेत जाहीर केला.
राज्यात सध्या दोन लाख मेट्रिक टन फुले गोळा होत आहेत. त्यामुळे जवळजवळ २०० कोटींची उलाढाल होत आहे. परिणामी मोहाची फुले साठवण्यास, त्यांची वाहतूक करण्यास, त्याचा व्यापार करण्यास असलेले निर्बंध दूर करण्यात येत आहेत. याबाबतची अधिसूचना लवकरच जारी केली जाईल, असे त्यांनी एका निवेदनाद्वारे जाहीर केले.