पिरंगुट: मौजे पिरंगुट ता. मुळशी येथील गणपती देवस्थान, पिरंगुट येथे स्थित असलेल्या थोर गाणपत्य महासाधू मोरया गोसावी यांच्या पूजेतील गणेशमूर्तीचे रविवार दि. ०९ सप्टेंबर, २०१८ रोजी श्री क्षेत्र थेऊर येथे आगमन होणार आहे . येथील श्री मोरया गोसावी यांचे वंशज देव कुटुंबीय दरवर्षी हि मूर्ती घेऊन थेऊर येथे द्वारयात्रा करतात. ही द्वारयात्रा भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते चतुर्थी या चार दिवसात असते.
देवस्थानच्या चारही दिशांना चार सीमाद्वारे आहेत. प्रत्येक दिशेला श्री मोरया गोसावी यांनी एक एक देवता आहे. कोरेगाव मूळ, म्हातोबाची आळंदी, मांजरी तसेच थेऊर येथील महातारी देवीच्या दर्शनाला या यात्रेत भाविक पायी जाऊन दर्शन घेतात . या चार दिवसात चारही दिशांच्या देवतांची मनोभावे पूजा करण्यात येते .
या काळात गोंधळ, जोगवा आदी कार्यक्रम आयोजन केले जाते .त्याचप्रमाणे प्रतिपदा ते सप्तमी या दरम्यान हा उत्सव सर्व ग्रामस्थ व भाविक व देव कुटुंबसह मोठ्या भक्तीभावाने सहभागी होत होतात ,अशी माहिती श्री गणपती देवस्थान, पिरंगुट ची विश्वस्त श्री. शशांक देव यांनी दिली.तर सक्षम भारत फौडेशनचे ट्रस्टी केदार देव सहभागी होणार आहेत .