मौलाना आझाद फाऊंडेशनतर्फे कापडी पिशव्यांचे वाटप

0

जळगाव। शासनाच्या राष्ट्रीय हरीत सेना नोंदणीकृत संस्था असलेल्या मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनच्या वतीने सुभाष चौक परिसरात नागरिकांना 200 कापडी पिशव्या वाटप करुन पर्यावरण संरक्षणाविषयी माहिती देण्यात आली.

पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्लॅस्टिक पिशवी (कॅरीबॅग) वापर टाळावा. शहरातील व बाहेरगावातून आलेल्या नागरिकांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले. तसेच प्लॅस्टिक पिशव्याचे वापरामुळे होणारे नुकसानबाबत माहिती देवून प्लॅस्टिक पिशव्याचा बहिष्कार करुन कापडी पिशव्याचा वापर करावा, अशी शपथ उपस्थितांनी घेतली. यावेळी अध्यक्ष फिरोज शेख, उपाध्यक्ष सलीम इनामदार, नीर जैन, जगदीश सपकाळे, अकिलोद्दीन शेख, नईम शेख, सर्फराज इनामदार, किशोर सपकाळे, अनिल शेख, गणेश महाले, राजेश जाधव, अनिस शेख आदी उपस्थित होते.