मौलाना आझाद यांना आदरांजली

0

जळगाव । भारताचे पहिले शिक्षणमंत्री म्हणून डॉ.मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी कामगिरी केली होती. त्यांच्या कार्याचा गौरव करीत त्यांना भारतरत्न पुरस्कारानेही गौरविण्यात आलेले आहे. इस्लामचा पवित्र धर्मग्रंथ कुराणाचा अभ्यास करून त्यावर ‘तर्जुमानुल कुरान’ हे पुस्तकही लिहिले आहे. मौलाना आझाद यांना अरबी, फारशी, इंग्रजी व उर्दू या भाषा चांगल्या अवगत होत्या व ते चारही भाषांतून लिखाण करीत असत. ते एक उत्कृष्ट वक्तेदेखील होते. त्यांची लेखणी कणखर व बाणेदार होती. त्यांनी आपल्या लेखनीतून इंग्रजी सत्तेचा विरोध केला आहे. त्यांचा जन्म दिवस 11 नोव्हेंबर रोजी सर्वत्र साजरा केला जातो. त्यांच्या जन्मदिन विविध कार्यक्रमांनी साजरा करत त्यांना आदरांजली वाहिन्यात आली. त्यांच्या जन्मदिनी त्यांच्या कार्याला उजाळा देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

शेंदूर्णीत आदरांजली
जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथे भारताचे प्रथम शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना आझाद रांची 13 वी जरंती जि.प.उर्दू कन्रा शाळेत शाळा व्रवस्थापन समिती अध्रक्ष अजझर खान रांच्या अध्यक्षतेखाली उत्साहत साजरी झाली. मौलाना आझाद समाज सुधारक, राजकारणासोबतच त्यांनी अन्न, हिलाला, अन्न. वृत्तपत्रे काढून अंग्रेज विरोधी लिखाण केल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.

कासोदा येथे फळवाटप
भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद जरंती निमित्ताने 11 नोव्हेंबर रोजी रेथील मौलाना आझाद विचार मंचच्रा वतीने अमर पॉलिक्लीनकमध्रे फळ वाटप करण्यात आले. रा प्रसंगी मौलाना आझाद विचार मंचचे अध्रक्ष अहेसानअली, उपाध्रक्ष अन्वर मिस्तरी डॉ.डी.आर. पाटील, मुख्तारअली, आरीफ पेंटर, शब्बीर गुप्ता, अब्दुल कादर आदी उपस्थित होते. विविध क्षेत्रात उल्लेखनिर काम करणारे, हजरात्रेहुन परत आलेले हाजी साहेबान, विद्यार्थ्रांना बक्षीस वितरण आदी कार्रक्रमचे आरोजन करण्रात आले आहे.

धानोरा विद्यालयात
चोपडा तालुक्यातील धानोरा येथील झिपरु तोताराम महाजन माध्यमिक व ना.भा.पाटील कनिष्ठ महाविद्यालयात भारतरत्न डॉ.मोलाना अब्दुल कलाम आझाद यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य के.एन.जमादार, चेअरमन सुकदेव भावसिंग पाटील, चुडामण पाटील, बी.एस.महाजन, प्रदीप महाजन, बाजिराव पाटील, वामनराव महाजन, उपमुख्याध्यापक एम.पाटील, पर्यवेक्षक बी.डी पाटील, ए.पी.खैरनार, ग्रंथपाल जगदिश पाटील, प्रा.रेखा महाजन, पुनम पाटील, एल.डी.पाटील, के.पी.बडगुजर, देवीदास महाजन, वासुदेव महाजन, योगेश पाटील, अरुण पाटील, प्रा.संजय बडगुजर, नवल महाजन, एस.एस.कोळी, पि.के.वंजारी, नवल महाजन, योगिता बाविस्कर, एस.डी.सोनवणे, उषा भिल्ल, एकता भांबरे, आर.बी.साळुंके , मच्छिंद्र महाजन, दीपक पाटील, डिगंबर सोनवणे, एस.एस.पाटील, चेतन चौधरी आदी उपस्थित होते.