नवी दिल्ली – म्यानमारच्या लष्कराने शुक्रवारी दुपारी २२ बंडखोरांना भारत सरकारच्या स्वाधीन केले. हे सर्व बंडखोर ईशान्य भारतातील मणिपूर आणि आसाम या दोन राज्यांशी संबंधित आहेत. या दोन राज्यातील सुरक्षा यंत्रणा बर्याच काळपासून या बंडखोरांच्या मागावर होत्या.
म्यानमार सरकारने प्रथमच ईशान्य भारतातील बंडखोर गटाच्या नेत्यांना ताब्यात देण्याची भारताची विनंती मान्य केली आहे असे अधिकार्याने सांगितले. हे बंडखोर म्यानमारमध्ये आश्रयाला होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नेतृत्वाखाली हे संपूर्ण ऑपरेशन पार पडले.