म्युकरमायकोसीसवरील उपचारासाठी ४० जणांचा टास्क फोर्स

जळगाव – जिल्ह्यात म्युकरमायकोसीस रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील भिषक, दंतरोग, कान,नाक,घसा, नेत्र, बालरोग, भूलतज्ञ अशा ४० डॉक्टरांचा टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद हे टास्क फोर्सचे प्रमुख आहेत. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या वैद्यकीय उपचाराच्या सोयी, सुविधा, औषधे या व्यतीरिक्त अन्य कोणत्याही प्रकारचे औषधे, सुविधा यांची आवश्यकता भासल्यास त्याबाबत टास्क फोर्सने मार्गदर्शन करावयाचे आहे.