म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण संपन्न

भुसावळ प्रतिनिधी दि 2

भुसावळ नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे सालाबदाप्रमाणे शाळेच्या माजी विद्यार्थिनी कै. मंजुषा सुधाकर नारखेडे. यांच्या स्मृती प्रित्यर्थ सुधाकर फकीरा नारखेडे यांच्याकडून शाळेतून इयत्ता दहावी मध्ये बोर्डाच्या परीक्षेत प्रथम, द्वितीय ,तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येते.यावर्षी प्रणव महेश पाटील हा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला याला 1151रु, द्वितीय क्रमांक- संध्या संतोष डावरे हिला 751रु , तृतीय क्रमांक विशाल भागवत वाघ याला 551रु प्रमाणे या तिघांना पारितोषिक म्हणून चेक प्रदान करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक ललित फिरके हे होते. बक्षीस वितरण सुधाकर नारखेडे यांच्या हस्ते करण्यात आले.सदर प्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. पुढील वर्षात बक्षिसाच्या रकमेत वाढ करून प्रथम व द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येतील.त्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यास करून जास्तीत जास्त गुण मिळवून आपल्याला पारितोषिक कसे मिळेल यासाठी प्रयत्न करावा. असे प्रतिपादन सुधाकर नारखेडे यांनी आपल्या भाषणात केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ.प्रदीप साखरे यांनी केले.