म्युनिसिपल हायस्कूल मध्ये सेवानिवृत्ताच्या निमित्ताने लावले सेवापृर्तीस्मृती वृक्ष …
(पर्यावरण जागर प्रतिष्ठान ची संकल्पना)
भुसावळ प्रतिनिधी दि 1
भुसावळ नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल मधील मुख्य लिपिक राजेंद्र चौधरी व उपशिक्षक निवृत्ती भादू वाडे यांनी 33वर्ष शिक्षक सेवा पूर्ण करून नुकतेच ते सेवानिवृत्त झाले.या निमित्ताने म्युनिसिपल हायस्कूल येथे त्यांचा सेवापूर्ती समारंभ आयोजित केला होता. त्याप्रसंगी त्यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक ललित फिरके होते .सेवानिवृत्त झालेले शाळेचे मुख्यालिपीक राजेंद्र चौधरी व निवृत्ती भादू वाडे व त्यांचे नातलग सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. रेखा सोनवणे, डॉ. प्रदीप साखरे, संजीव चौधरी यांनी त्यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले. व त्यांना पुढील उर्वरित आयुष्याच्या आनंदमय व निरोगी राहण्याच्या शुभेच्छा दिल्या. नंतर सर्व विद्यार्थी व शिक्षकांना स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष व हरित शहर स्वच्छ शहर संकल्पना राबविणारे नाना पाटील व सुरेंद्र सिंग पाटील यांनी निवृत्ती वाडे यांचे वृक्ष देऊन सत्कार केला व सेवापुर्तीचे स्मृती वृक्ष लावण्या साठी प्रोत्साहित केले . त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक निसर्गप्रेमी ललित फिरके यांनी लगेच क्रीडा शिक्षक व राज्य क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ . प्रदीप साखरे यांना सांगून लगेच शाळेच्या आवारातच सेवापूर्ती वृक्ष निवृती वाडे तसेच जावाई,मुले विशाल वाडे, सौ योगिता वाडे, सागर वाडे शाळेतील मुख्याध्यापक ललित फिरके पर्यावरण जागर प्रतिष्ठान चे नाना पाटील ,सुरेंद्र सिंग पाटील, डॉ.प्रदीप साखरे,एस टी चौधरी व शाळेतील विद्यार्थी च्या हस्ते वृक्ष लावण्यात आले .यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ललित फिरके यांनी शाळेतून सेवा निवृत्त होणाऱ्या शिक्षकांच्या सेवापुर्ती चे स्मृती वृक्ष आम्ही लावण्याचा प्रयत्न करू असे यावेळी त्यांनी सांगितले .वृक्ष लावण्यासाठी एक भावनिक नातं तयार व्हावं यासाठी निमित्त कोणतीही असो त्याला जर भावनिकतेची जोड दिली तर ते वृक्ष लावलं जाऊन त्याचे संवर्धन सुद्धा केले जात असते.यामुळेच आम्ही हा उपक्रम सेवापूर्ती चे स्मृति वृक्ष म्हणून लावत असतो.सेवापुर्तीचे स्मृती वृक्ष हा पहिला उपक्रम भुसावळ शहरात राबविला जात आहे . या उपक्रमाचे उपस्थित आपल्या सर्वu शिक्षक बंधू-भगिनींनी आप्तेष्ट ,नातेवाईकांनीही कौतुक केले .