महायुतीच्या मेळाव्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघांनी माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील यांना मारहाण केल्यानंतर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व सहकार मंत्री गुलाबराव पाटील यांनी संतप्त कार्यकर्त्यांना व्यासपीठावरून खाली ढकलल्याने अनर्थ टळला. यावेळी वाघ समर्थक व गुलाबराव पाटील यांच्यात शाब्दीक चकमक उडाली. यावेळी पाटील यांनी दंड थोपटून समोरच्याला आव्हान दिले, त्यांचा रौद्ररूप पाहून समोरच्यांनी काढता पाय घेतला.