रत्नागिरी । राज्यात सध्या मध्यावधी निवडणुकीची चर्चा सुरू आहे. मात्र मध्यावधी निवडणुकांची चर्चा व्यर्थ असून लोकांचे लक्ष महत्वाच्या मुद्यांकडून तिसरीकडे वळवण्यासाठी ही टूम असल्याचे सांगत अजित पवार यांनी शिवसेना भाजपवर प्रहार केला आहे. पक्षाच्या कार्यक्रमासाठी शहरात आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे माध्यमांशी बोलत होते. गेल्या काही दिवसांमध्ये भाजप शिवसेनेमध्ये धुसफूस सुरू आहे. त्यातच दोन्ही पक्षांकडून मध्यावधी निवडणूक झाली तर आपण सज्ज असल्याची वक्तव्येही आली होती. मात्र 15 वर्षानंतर हे दोन्ही पक्ष सत्तेत आले आहेत, ते कशाला सत्ता सोडतील असा सवाल अजित पवार यांनी मिश्कीलपणे
विचारला आहे.
विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी वाघ व शेळी असे एकमेकांवर आरोप करणारे मात्र सत्तेत एकत्रित आले.
-आ. अजित पवार,
ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी कॉंग्रेस