…म्हणून अमित शहा झाले अॅडमिट; एम्सचे पत्र जाहीर

0

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आरोग्य विषयक समस्या उद्भवत आहेत. २ ऑगस्ट रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर १४ ऑगस्टला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनातून बरे झाल्यानंतर त्यांना श्वसनासंबंधी त्रास जाणवू लागल्याने एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतरही त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान काल रात्री त्यांना पुन्हा एम्समध्ये दाखल करण्यात आले, त्यामुळे देशभरात चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान एम्सने पत्र जाहीर केले असून अमित शहांना रुग्णालयात दाखल करण्यामागचे कारण दिले आहे.

दोन दिवसानंतर संसदेचे अधिवेशन सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विषयक तपासणीसाठी अमित शहा एम्समध्ये दाखल झाले आहेत. चाचण्या पूर्ण झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. त्यांची प्रकृती उत्तम असून चिंता करण्याचे कारण नसल्याचे एम्सने सांगितले आहे.