… म्हणून ते विद्यार्थ्यांच्या स्मरणात रहातील : डॉ. भोस

0

भरत काशिद यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम उत्साहात

सांगवी : विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात क्रीडा शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण असते. केवळ राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार केले म्हणजे क्रीडा शिक्षकाचे आयुष्य यशस्वी झाले असे होत नाही. तर शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये व्यायामाची आवड निर्माण करून त्याचे शारीरिक स्वास्थ निरोगी कसे राहिल याकडे लक्ष असले पाहिजे. असेच क्रीडा शिक्षक भरत काशिद आहेत. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडविले आहे. अनेक मल्ल त्यांनी घडविले. त्यामुळेे काशिद सर कायम विद्यार्थ्यांच्या स्मरणात रहातील, असे गौरवोद्गार जनता शिक्षण संस्थेचे माजी सचिव डॉ. राम भोस यांनी काढले. दापोडी येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर प्रशालेतील जेष्ठ क्रीडा शिक्षक भरत काशिद यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम नुकताच पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

येथील गणेश मंगल केंद्रात पार पडलेल्या या कार्यक्रमास छत्रपती पुरस्कार विजेत्या अरूणा देशमुख काशिद, आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रद्युम्न ठाकरे, सुचिता कुदळे, नगरसेविका आशा शेंडगे, प्राचार्य हनुमंत चव्हाण, रमाकांत दरेकर, अंकुश मुखेकर, संजय शेंडगे, राज्य पुरस्कार विजेते क्रीडा शिक्षक तुळशीराम नवले, यांच्यासह परिसरातील शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. क्रीडा शिक्षक काशिद हे स्वतः कुस्ती पटू असल्याने त्यांनी आपल्या कारकीर्तीत शेकडो मल्ल घडविले. कुस्ती, कबड्डी या दुर्लक्षित खेळाची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली. काशिद यांनी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवरचे पैलवान तयार केले. त्यामुळे परिसरातील विद्यार्थी वर्ग यावेळी उपस्थित होता.