म्हशीला चरवण्यासाठी मिळतोय मासिक 25 हजार रुपये पगार

0

नवी दिल्ली। सामान्यत: म्हशीचे दूध विकून अनेकजण पैसे कमवतात. पण, म्हशीला चरविण्यासाठीही पगार मिळतो हे तुम्हाला माहिती आहे का? आणि तोही एक-दोन हजार रुपये नाही तर तब्बल 25 हजार रुपये. ऐकूण आश्चर्य वाटलं ना? पण हे खरे आहे. उत्तर भारतातील एका गावात म्हशींना चरविण्यासाठी चक्क 25 हजार रुपये पगार दिला जातो. म्हशी चरविण्यासाठी पगार मिळतो हे ऐकल्यावर कदाचित तुम्हाला हसायला येईल. नोएडा आणि ग्रेटर नोएडा परिसरातील झट्टा गावातील शेतकर्‍यांनी आपल्या म्हशी चरवण्याच्या कामासाठी नोकरी उपलब्ध केली आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार, बिहारमधील झकसकुमार हा व्यक्ती ही नोकरी करत असून तो 50 म्हशींना चरवतो आणि महिन्याला तब्बल 25 हजार रुपये पगारही घेतो. झकस प्रमाणेच आता बिहार आणि उत्तर प्रदेशातील अनेक युवक हेच काम करत आहेत.

हिट झाली आयडिया
गावातील अनंगपाल या शेतकर्‍याने सांगितले की, म्हशीला चरविण्यासाठी हे मजुर घेऊन जातात आणि त्यामुळे म्हैस चांगली दूधही देत आहे. प्रत्येक म्हैस आता दररोज सरासरी 10 ते 15 लिटर दूध देते आणि त्यामुळे आम्हाला महिन्याला हजारो रुपये फायदा होत आहे.

म्हशींना चारा द्या आणि कमवा हजारो रुपये
गावातील सोहनपाल पहलवानने सांगितले की, या ठिकाणी शेतकर्‍यांना इतका वेळ नसतो की म्हशींना चरविण्यासाठी घेऊन जातील. त्यामुळे शेतकर्‍यांनी मजदुरांना आयडिया दिली की म्हशींना चरविण्यासाठी घेऊन जात जा आणि प्रत्येक म्हशीमागे 500 ते 700 रुपये कमवा.