म्हसदीचे डाळींब बागायदार शेतकरी शाम देवरेंना कृषीभूषण पुरस्कार जाहीर

0

म्हसदी। साक्री तालुक्यातील म्हसदी येथील डाळींब बागायतदार शेतकरी शाम शंकर देवरे यांना खान्देश वारकरी सेवा मंडळातर्फे आज विशेष कार्यक्रमात कृषीभूषण पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. दरवर्षी धुळे येथील खान्देश वारकरी सेवा मंडळातर्फे नाशिक विभागातून कृषीभूषण पुरस्कार देण्यात येतो. यंदा या पुरस्कारासाठी बागायदार शेतकरी देवरे यांची निवड करण्यात आली आहे.

देवरे यांना 2007 पासून डाळींबाच्या शेतीला प्रारंभ केला. त्यांनी आपल्या बागेत आरक्ता (मृदूला) नावाचा उत्कृष्ट डाळींब काढला. या डाळींबाला बनारस, कलकत्ता, लखनौ, पटना या राज्यांमध्ये मागणी वाढली. प्रारंभी 35 रूपये किलाप्रमाणे विकला जाणारा डाळींब 125 रूपये किलोप्रमाणे गेला. दोन एकरमध्ये 22 टनपर्यंत डाळींबाचा माल काढला. यामुळे त्यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. आज सायंकाळी 6 वा. एकविरानगर धुळे येथे हभप ज्ञानेश्‍वर माऊली यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे.