साक्री । साक्री तालुक्यातील म्हसदी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत लोकसहभागातुन झालेला बदल पाहण्यासाठी पुणे येथील ग्यानकी प्रकाश फाउंडेशन अंतर्गत नंदूरबार जिल्हा परिषदेच्या 9 प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी विशेष भेट देऊन पाहणी केली. यावेळी झालेला बदल पाहून आलेल्या गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विभागाचे तज्ञ, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, केंद्रप्रमुख आदींनी कौतुक केले. या शाळेत ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतुन जलशुध्दीकरण केंद्र, संगणक प्रणालीचे शिक्षण, यांसह प्राथमिक शाळा डिजिटल व्हावी म्हणून धनदाईदेवी तरुणऐक्य मंडळ, सरपंच सतिश रामराव देवरे यांच्यासह ग्रामस्थांनी आर्थीक मदत केली. तसेच विद्यार्थ्यांसाठी आरश्यापासून ते गॅस शेगडी, ध्वज स्तंभ, गणवेश, टाय, बुट, पिण्याच्या पाण्यासाठी नळ, हात धुण्यासाठी हॅणडवॉश, प्रत्येक वर्गात घडयाळ, विद्यार्थ्यांना हात पुसण्यासाठी रूमाल, ओळखपत्र, वृक्षारोपणासह विविध कामे लोकवगणीतुन साकारली आहेत.
14 व्या वित्त आयोगातून विविध सुविधा
याच सुविधांची पाहणी करण्यासाठी नंदूरबार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. यावेळी केंद्र प्रमुख भगवान धोबी, मुख्याध्यापक डी.डी.महाले, साहेबराव गिरासे, शाळा वयसथापन समितीचे अध्यक्ष किरण देवरे आदींनी लोकसहभाग कसा घेतला याची माहिती दिली. तर शिक्षक जगदीश पाटील व शिक्षिका मनिषा पाटील यांनी अध्यापनाशिवाय शाळेत राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. शेवटी शासनाच्या मदतीची वाट न पाहता लोकसहभाग वाढवुन आम्ही देखील आमची शाळा अशीच सुंदर करू, असा निश्चय पथकाने व्यक्त केला. शेवटी आभार शिक्षक विजय देवरे यांनी मानले. यावेळी केंद्र शाळेतील शिक्षक व शिक्षका
उपस्थित होत्या.