म्हसदी परिसरात पावसासाठी ‘धोंडी धोंडी पाणी दे’ची हाक

0

म्हसदी। साक्री तालुक्यातील म्हसदी परिसरात पाऊस नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. परिसरातील नदी,नाले,लघु प्रकल्प कोरडे आहेत. म्हसदी गावात ग्रामपंचायत मार्फेत सात ते आठ दिवसात एकदा पिण्याचे पाणी मिळत आहे.

पाऊस नसल्यामुळे ग्रामीण भागातील आठवडे बाजारावर परिणाम जाणवु लागला आहे. सद्या विहीरींनी तळ गाठलयामुळे पिके जगवायची तरी कशी असा प्रश्‍न शेतकर्‍यांसमोर उभा ठाकला आहे. म्हसदी, ककाणी, काळगांव,धमनार, देऊर(बु), देऊरखुद, राजबाईशेवाळी, चिंचखेड़ा, भड़गांव(मा) आदी भागात पाऊस नसल्यामुळे शेतकरी हवाल दिल झाले आहेत. पावसाने हजेरी लावावी यासाठी गावांमध्ये’ धोंडी धोंडी पाणी दे’ मरीमायची मिरवणुक,लाकडी वानराची मुर्तीची मिरवणुक काढण्यात येत आहे. पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.