म्हसदी येथे एक दिवशीय कृषी मार्गदर्शन कार्यशाळा

0

साक्री । तालुक्यातील म्हासदी येथे ग्रामीण कृषी कार्यक्रम अंतर्गत एकदिवशीय कृषी मार्गदर्शन कार्यशाळा दोंडाईचा येथील विकसरत्न सरकारसाहेब रावल कृषि महाविद्यालयातर्फे ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन दोंडाइचा येथील कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.आर.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणेे म्हणून धुळे कृषि महाविद्यालयाचे प्रा.डॉ.बी.एन पाटिल, व प्रा.डॉ आर.टी चौधरी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.किरण पाटील यांनी केले.

साक्री तालुक्यातील कृषिदुतांची उपस्थिती
प्रा.डॉ डी. आर. पाटील, प्रा.डॉ सैंदाने , प्रा.डॉ.आर.टी.चौधरी, प्रा.डॉ बी.एन.पाटील, प्रा.डॉ भगत सर, प्रा.डॉ आंधळे , प्रा.डॉ आर बी राजपूत, प्रा. नीलेश पाटील, प्रा. सविता शिंदे, प्रा.राहुल पाटील आदींनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. या प्रसंगी प्राचार्य डॉ. डी.आर पाटील उद्घाटन करतांना म्हणाले की, ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम महाविद्यलयाच्या दृष्टीने उत्तम अनुभव देणारा उपक्रम आहे. याचा लाभ प्रशिक्षणार्थी यांनी घ्यावा. तसेच ग्रामीण भागातील शेतकरी अनुभवी असतात त्याचं मार्गदर्शन व प्रशिक्षणर्थीचा अभ्यास यांची सांगड घालवी असे प्रा. डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी दोंडाईचा कृषि महाविद्यालायचे प्रशिक्षणर्थी हर्षल बागुल, प्रशांत भोई, सदाशिव न्याहळदे, विकास पवार, प्रमोद पाटिल, भानु वेंकटप्रसाद, चंदन गुगुलुथ आदींनी सयोजंन केले. याप्रसंगी सूत्रसंचालन प्रा.डॉ किरण पाटिल यांनी तर आभार हर्षल बागुल यांनी मानले. यावेळी डोंडाईचा कृषी महाविद्यालयचे साक्री तालुक्यातील कृषी दुत उपस्थित होते.