म्हसदी येथे विविध जाती-धर्मांतील सात जोडप्यांच्याहस्ते आरती

0

गावातील प्रत्येक उत्सावात दिसून येते सर्वधर्म समाभावाचे प्रत्यय

म्हसदी । साक्री तालुकयातील म्हसदी येथील राजे संभाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. मंडळातर्फे सवधर्म समभाव या विचाराने विविध जातीधर्माच्या सात जोडप्याच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. यावेळी आदिवासी व मुस्लिम समाजाच्या जोडप्यांचा ही समावेश होता. गावांमध्ये कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात येथील मुस्लिम समाज एकत्र येऊन सण साजरा करतात. रविवारी याचा प्रत्यय आला. आरती पाहण्यासाठी मंडळाजवळ मोठी गर्दी झाली होती. टिपर्‍या खेळण्यासाठी सर्व समाज एकत्र येत असल्याने बघण्यााठी मोठी गर्दी असते.

पाच दिवसात २५ हजार भाविकांनी घेतले दर्शन
साक्री । येथील धनदाईदेवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवानिमित दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली. त्यामुळे मंदिर परिसरात झगमगाट झाली आहे. धनदाई मंदिरात पहाटे पासून गेल्या पाच दिवसात पंचवीस हजाराहुन अधिक भाविकांनी दर्शन घेतले. मंदिरात बाहेर गावाहुन आलेल्या अकरा व अन्य दहा भाविकांनी घटस्थापना केली आहे. पहाटे रोज सामुहिक काकड आरती केली जाते. त्यामुळे पहाटेपासूनच भाविकांची मंदिराकडे गर्दी सुरू होते. त्यामुळे धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळातर्फे पथदिव्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मंगळवार, शुक्रवार, रविवार तसेच पंचमी, सप्तमी, अष्टमी व नवमीला भाविकांची मोठी गर्दी राहील असा अंदाज धनदाईतरुण ऐक्य मंडळाचे अध्यक्ष हिंमतराव देवरे, उपाध्यक्ष रघुनाथ देवरे, खजिनदार सुधाकर देवरे, सचिव सुभाष देवरे व संचालक मंडळाने दिली.