साक्री । तालुक्यातील म्हसदी येथील विविध कायकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी जयेश वसंतराव गुंजाळ यांची तर व्हा.चेअरमनपदी प्रदीप तरयबंक देवरे यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली. सोसायटीचे चेअरमन महेंद्र देवरे व व्हा.चेअरमन शंकुतलाबाई देवरे यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे सोसायटी चेअरमन व व्हा.चेअरमन पदाच्या निवडीसाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी चेअरमनपदासाठी जयेश गुंजाळ व व्हा.चेअरमनपदासाठी प्रदीप देवरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
यावेळी संचालक दगाजी देवरे, आत्माराम देवरे, संतोष देवरे, ओंकार देवरे, रमेश देवरे, मंगलाबाई देवरे, दिपक देवरे, संभाजी देवरे, राकेश देवरे, शंकुतलाबाई देवरे उपस्थित होते. डॉ.वसंतराव देवरे यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीच्या 6 जागा निवडून आल्या होत्या. दोन संचालकांनी पाठींबा दिल्यामुळे डॉ.देवरे यांच्या गटाला संधी मिळाली. यावेळी माजी चेअरमन निंबाची देवरे, ग्रामपंचायत सदस्य गंगाराम देवरे, धुळे येथील देवाजी सोनार, नगरसेवक गणेश जाधव, अभियंता वसंत गुंजाळ, साक्री उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिपक जैन आदीं उपस्थित होते. यावेळी निवडमुक अधिकारी म्हणुन गिरीश महाले यांनी काम पाहिले तर सचिव काशिनाथ बेडसे यांनी सहकार्य केले.